मुळाणे गावाची माहिती

मुळाणे गाव हे नाशिक पासून ९३ किलोमीटर अंतरावर बागलाण तालुक्यात दोधेश्वर देवस्थान रस्त्यावर आहे. सटाणा पासून पाच किलोमीटर अंतरावर हे मुळाणे गाव आहे. मुळाणे गावाचे क्षेत्रफळ एकूण 1366 हेक्टर मध्ये आहे. मुळाणे गावाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 1850 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार मुळाणे गावात 380 कुटुंब राहतात. ह्या गावात शिक्षणाचा अतिशय चांगली अशी सुविधा अंगणवाडी पासून तर दहावीपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा आहे.